बीड जिल्ह्यात जनावरांची चोरी ही गंभीर समस्या बनली असून, त्यावर अंकुश ठेवण्यासाठी बीडचे पोलीस अधीक्षक नवनित काँवत यांनी सर्व पोलीस अधिकाऱ्यांना कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेने जनावरे चोरणाऱ्या टोळीविरुद्ध विशेष मोहीम राबवली आणि त्याला मोठे यश मिळाले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की नितीन संजय जाधव (रा. गांधीनगर, बीड) याने चारचाकी वाहनांद्वारे काही जनावरे चोरून आपल्या घरी नेली आहेत त्यानुसार तिथे जाऊन छापा टाकून त्याला ताब्यात