मंगळवार, दि. २६ ऑगस्ट रोजी सकाळी सातच्या सुमारास मिळालेल्या गुप्त माहितीनुसार तालुका पोलिसांनी भोसे-चिंचोली परिसरात अचानक धाड टाकली. या कारवाईत नदीकाठी अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा ट्रक ताब्यात घेण्यात आला. या कारवाईत पोलिसांनी दोन ब्रास वाळूसह ट्रक जप्त केला असून, एकूण मुद्देमालाची किंमत तब्बल १० लाख १२ हजार रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, ट्रक चालक आणि ट्रक मालकाविरोधात बीएनएस कलम ३०३, ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.