ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करून विदेशी बनावटीचा मद्य साठा वाहतूक करणारा टेम्पो राज्य उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात घेऊन मोहम्मद सलमानी नावाच्या वाहन चालकाला अटक केली आहे. गोवा निर्मित चौदाशे बॉक्स जप्त करून एक कोटी 56 लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. खारेगाव कडून ठाण्याकडे येणाऱ्या रस्त्यावरच सापळा रचून राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे.