व्याळा येथील एका महिलेला सर्प दंश झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री नंतर म्हणजे मंगळवार दि.५ ऑगस्ट रोजी २ वाजेच्या सुमारास घडली असून त्या महिलेची प्रकृती जिंताजनक असल्यामुळे उपचारासाठी अकोला येथील सरकारी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्या महिलेच्या पतीने सापा बदल सर्पमित्र कुलदीप दामोदर याला दिली असता सर्प मित्राने त्या सापाला दुपारच्या दरम्यान त्या मन्यार जातीच्या विषारी सापाला रेस्क्यू करून निसर्गाच्या सानिध्यात सोडले.सद्या महिलेची प्रकृती ठिक असल्याचे समजते.