काही दिवसांपूर्वी विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कॅम्प क्रमांक चार येथील गीता कॉलनी येथे तीक्ष्ण हत्यारांनी सिद्धार्थ रामटेके आणि त्याच्या बारा ते पंधरा साथीदारांनी शिक्षण हत्यारांनी गाड्यांची तोडफोड करून परिसरात दहशत माजवली होती. पोलिसांनी याची दखल घेऊन रामटेके नावाच्या आरोपीला ताब्यात घेतले आणि दहशत माजवली त्याच परिसरातून त्याची धिंड काढली. तसेच इतरांनी कोणी दादागिरी, गुंडगिरी आणि तोडफोड केली तर त्याची देखील हीच अवस्था होईल असा इशारा या माध्यमातून दिला.