मराठा आरक्षणासाठी मुंबई येथील आजाद मैदान येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातील आंदोलनाला यश मिळाले असून राज्य सरकारने आंदोलनाच्या प्रमुख मागण्या मान्य केल्या या ऐतिहासिक विजयाचा दिनांक 3 सप्टेंबर बुधवार रोजी दुपारी एक वाजे दरम्यान औंढा नागनाथ शहरातील बस स्थानक परिसरात सकल मराठा समाज बांधवांकडून मोठा जल्लोष करून शहराच्या प्रमुख मार्गाने भव्य विजयी मिरवणूक काढत आनंदोत्सव साजरा केला यानंतर आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथ दुग्धाभिषेक करून मिरवणूक संपन्न झाली.