मराठा समाजाला नुकतेच आरक्षण मिळाल्यानंतर बंजारा समाजानेही ऐतिहासिक दाखले देत आरक्षणासाठी ठाम मागणी केली आहे. निजाम काळातील हैद्राबाद गॅझेटमधील उल्लेखानुसार बंजारा समाज हा आदिवासी घटक असून, महाराष्ट्रात त्यांचा अनुसूचित जमाती (एस.टी.) प्रवर्गात तातडीने समावेश व्हावा अशी मागणी बंजारा समाजाच्या वतीने करण्यात आले. ९ सप्टेंबर रोजी तीन वाजता जिल्हाधिकारी यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले.