जय भवानी रोड भागातील लोणकर मळा येथे पुन्हा बिबट्याचा वावर सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून परिसरात भीतीचे वातावरण कायम आहे.लोणकर मळा येथील एस एस नेहरा यांच्या बंगल्याच्या समोरून बिबट्या वन्य प्राण्यांच्या भक्षणासाठी फिरत असल्याचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.चार ते पाच दिवसांपूर्वी याच परिसरात बिबट्या आढळून आला होता.स्थानिक लोकप्रतिनिधी अँड.नितीन पंडित,उबाठा गटाच्या योगिता गायकवाड यांनी वन विभागाला पिंजरा लावण्याची मागणी केली होती.