हिंगणघाट,खाजगी कंपनीत वाहनचालक म्हणून कार्यरत असणाऱ्या मनोज छत्रपाल वेदी याची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घटनेतील तीन आरोपींना ताब्यात घेल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली असून व्याजाने दिलेल्या पैश्याचे घेण्यादेण्याचे वादातून आरोपींनी त्याचा निर्घृण खून केल्याचे सांगण्यात येते आहे. स्थानिक रंगारी वार्ड येथील रहिवासी मनोज वेदी हा शहरातील यशोदा सिड्स या कंपनीत वाहनचालक असून त्याला पत्नीसह दोन मुले, एक मुलगी अशी अपत्ये आहेत.