श्री साई सेवा मंडळाची औंढा नागनाथ ते शिर्डी जाणारी पायदळ दिंडी यावर्षी दिनांक आठ सप्टेंबर सोमवार रोजी सकाळी दहा वाजता श्रीक्षेत्र औंढा नागनाथ येथील आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथ मंदिर येथून ६० साई भक्तासह पायदळ शिर्डी कडे रवाना झाली आहे. तत्पूर्वी श्री नागनाथ मंदिर येथे साईबाबाची आरती करून दिंडी मार्गस्थ झाली यावेळी महंत शामगिरी जी महाराज, सुजितसिंह ठाकूर, साहेबराव देशमुख, अनिल देशमुख, बाळासाहेब ठाकूर, प्रदीप गंभीरे, लक्ष्मण पवार, श्री साई सेवा पदाधिकारी उपस्थित होते