मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा बांधवांचं आज शुक्रवार दिनांक २९ ऑगस्ट रोजी सकाळपासून आंदोलन सुरू आहे आझाद मैदान परिसरात हजारो मराठा बांधवांनी गर्दी केली असून मुंबईतील वाहतूक ठप्प झालीय. सीएसएमटी परिसरात आंदोलनामुळे चक्का जाम झालाय.