आज दिनांक 3 सप्टेंबर रोजी रात्री नऊच्या दरम्यान भोकर तालुक्यातील नांदा इथे भीषण अपघात.भोकर तालुक्यातील पाळज येथील प्रसिद्ध गणपती बाप्पा यांचे दर्शन घेऊन परत जाणारी एक कार उभ्या ट्रकवर आदळून झालेल्या भीषण अपघातांत तीन जण ठार झाले आहेत. मयत सर्व तेलंगणा राज्यातील निजामबाद जिल्ह्यातील बोधन येथील आहेत. भोकर तालुक्यातील नांदा येथील शाळेजवळ उभ्या असलेल्या ट्रकला कार ने धडक दिली यात तीन जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.