राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजने सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत धुळे जिल्ह्यातील १७८५ युवकांना विविध शासकीय आस्थापनामध्ये नियुक्ती देण्यात आली आहे. अशी माहिती धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी एका प्रसिद्ध पत्रकार दिले आहे.