ठाणे-वाशी लोकलमध्ये दोन प्रवाशांमध्ये फ्री स्टाइल हाणामारी झाल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ठाणे-वाशी ट्रान्स हार्बर मार्गावर लोकलमध्ये दोन प्रवाशांमध्ये सीट वरून वाद झाला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर दोन प्रवाशांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. मात्र त्यांची हाणामारी एका प्रवाशांनी आपल्या मोबाईल मध्ये चित्रित केले असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.