नगर-मनमाड महामार्ग दुरुस्तीसाठी रस्ता कृती समितीने बुधवारी राहुरी फॅक्टरी येथे रास्ता रोको आंदोलन छेडले होते. दरम्यान आंदोलनातील नऊ आंदोलकांविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते. सदर गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी रस्ता कृती समितीच्या वतीने केली असून आज शुक्रवारी तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.