बीड जिल्ह्यातून एक अत्यंत हृदय पिळवटून टाकणारी आणि दुर्दैवी घटना समोर आली. काटवटवाडी गावात अवघ्या सात महिन्यांच्या एका चिमुकलीचा घशात चॉकलेट अडकून मृत्यू झाला. आरोही आनंद खोड असं मृत चिमुकलीचे नाव आहे. आरोही घरात खेळत होती. खेळता खेळता तिने खाली पडलेले चॉकलेट पाहिले आणि ते उचलून तोंडात टाकले.लहान बाळाला गिळण्याची प्रक्रिया पूर्णपणे विकसित झालेली नसते, त्यामुळे चॉकलेट तिच्या घशात अडकले. तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला