बनावट कागदपत्रे आणि खोटे शपथपत्र तयार करून सिटी सर्व्हेचा प्लॉट हडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन सख्ख्या भावांविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सोमनाथ दादाराव डाके (वय ६५, रा. तांबरी विभाग, बार्शी नाका, धाराशिव) यांनी मंगळवार, दि. २५ ऑगस्ट २०२५ रोजी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, आरोपी सुनिल मारुती डाके आणि शिवा मारुती डाके तुळजापूर यांच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती २६ ऑगस्ट रोजी ६ वाजता देण्यात आली.