जिल्ह्यात परतीच्या पावसाने भद्रावती तालुक्यात अगदी थैमान घातले असुन ढगफुटी सदृष्य आलेल्या या पावसामुळे कोंढा नाला, इरई नदी, माजरी गावालगतची शिरना नदिला पुर आल्याने तालुक्यातील ग्रामीण जिवन प्रभावित झाले आहे. तर या पावसामुळे तालुक्यातील अनेक अंतर्गत मार्ग आज दि 2 सप्टेंबर ला 8 वाजता बंद पडून अनेक गावांचा एकमेकांशी संपर्क तुटलेला आहे.