भद्रकाली भागातील अजमेरी चौक येथे हद्दपार गुन्हेगाराला पोलिसांनी ताब्यात घेऊन भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नवाज कलीम शेख राहणार आयेशा पार्क, अजमेरी चौक, भद्रकाली याला परिमंडळ एक उपायुक्त यांच्या आदेशाने नाशिक शहर व ग्रामीण भागातून एक वर्षाकरिता हद्दपार केलेले असतानाही घराच्या परिसरात फिरताना पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कारवाई केली आहे.पोलीस हवालदार जुंद्रे या प्रकरणी पुढील तपास करत आहे.