पोलीस स्टेशन एमआयडीसी बुटीबोरी हद्दीतील सालई धाबा येथे राहणारी कबड्डी खेळाडू कुमारी छकुली पिटेकर वय 19 वर्ष हिने 31 जुलै रोजी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली होती याप्रकरणी एमआयडीसी बुटीबोरी पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला होता. चौकशी दरम्यान कबड्डी कोच आत्महत्येस जबाबदार असल्याने त्याला अटक करून त्याची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.