सांगली-कोल्हापूर मार्गावरील अंकली पुलावरून कृष्णा नदीत एका महिलेने उडी घेतल्याची धक्कादायक घटना आज शनिवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली.या घटनेत महिलेचा मृत्यू भीती व्यक्त केली जात आहे.अनिता अरविंद हजारे असे उडी घेतलेल्या महिलेचे नाव आहे.हजारे यांचे मुळगाव अग्रणी धुळगाव,ता.कवठेमहांकाळ हे असून ते सध्या नोकरीनिमित कोल्हापूर जिल्ह्यातील उचगाव येथे राहत आहेत.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार,अनिता आपल्या पतीसोबत सांगलीहून कोल्हापूरकडे दुचाकीवरून जात होत्या.