शिरोळ शहरातील उपकारनगर परिसरात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून सुमारे साडेतीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.याप्रकरणी शिरोळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध आज बुधवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी कृष्णात श्रीपती रसाळ (वय ५२, रा. कृष्णकुंज निवास, उपकारनगर, मौजे आगर, ता. शिरोळ) यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली.