जिल्ह्यातील पी एम श्री जि. प.वरिष्ठ केंद्रीय प्राथमिक शाळा कोठारी येथील कर्तव्यनिष्ठ प्रेमळ आणि आदर्श शिक्षक असलेले उमेश जगदेवराव गहूले, संतोष उत्तमराव मुळे , उषाताई ज्ञानदेव गवई ह्या तीन शिक्षकांची बदली झाली याबद्दल शाळेच्या वतीने या तीन शिक्षकांना निरोप देताना दिनांक 9 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता विद्यार्थ्यांना गहिवरून आले काही विद्यार्थ्यांनी चक्क शाळेचे गेट बंद करून जाऊ नका असा आग्रह केला, विद्यार्थी व विद्यार्थीनी चे अश्रु अनावर झाले व विद्यार्थी शाळेचे गेटच बंद केले.