29 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील मुंबईत धडक मोर्चा काढणार असल्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे, पण या इशाऱ्यावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जोरदार टीका केली आहे.हाके यांनी जरांगे पाटलांवर थेट आरोप करताना ते समाजात दहशत निर्माण करत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री सातत्याने कोणाची सत्ता असल्यावर आपलं पद कायम पीक असतं असं करणारे अजित पवार यांच्यावरही लक्ष्मण हाके यांनी पलटवार केला आहे.