मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात समाविष्ट करण्याच्या शासनाच्या कथित प्रयत्नांविरोधात अमळनेर येथे ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि इतर ओबीसी संघटनांनी हैदराबाद गॅझेटियर बाबत काढलेला शासन निर्णय (जीआर) तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. याबाबत शुक्रवारी ५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता अमळनेर प्रांताधिकारी यांना निवेदन दिले आहे.