आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. राज्यामध्ये शिवसेना शिंदे गट भाजप यांची युती असताना देखील ठाण्यामध्ये मात्र भाजप आणि शिवसेना शिंदे गटांमध्ये धुसपुस असलेली पाहायला मिळत आहे. शिंदे गटाचे नेते आणि भाजपचे नेते यांच्यामध्ये सातत्याने टीका टिप्पणी पाहायला मिळत आहे. त्यातच वनमंत्री गणेश नाईक यांनी आज ठाण्यामध्ये जनता दरबार भरवला. यावरून आता त्यांच्यामध्ये शीतयुद्ध असल्याची चर्चा सुरू आहे.