महिला बचत गटाच्या सदस्यांनी महागाव तालुक्यातील दगडधर गावात मोठ्या प्रमाणावर सुरु असलेल्या अवैध गावठी व देशी दारू विक्री तसेच जुगार व्यवसायाविरोधात पोलीस निरीक्षक महागाव यांचेकडे लेखी तक्रार आज दि. २२ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता दाखल केली आहे. निर्मला बाबुसिंग चव्हाण, पुष्पा विजय खुडे यांच्यासह गावातील अनेक महिलांनी सादर केलेल्या अर्जात दारूच्या व्यसनामुळे गावात भांडणे, तंटे होत असून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाल्याचे नमूद केले आहे. तसेच जुगारामुळे गावातील शांतता धोक्यात आली.