जामखेड शहरातील विंचरणा नदीच्या पुलावर काल रात्री तीन अज्ञात व्यक्ती लघु शंका करत असताना लघु शंका करू नका महिला आहेत असं म्हटल्याचा राग आल्याने आरोपींनी कुणाला पवार व आदित्य पोकळे या दोन युवकांना शिवीगाडी करत लाथा बुक्क्याने मारहाण सुरू केली आरोपींनी केलेल्या गोळीबारामध्ये कुणाल पवार यांच्या पायाला गोळी लागली असून त्याला अहिल्यानगर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत गोळीबार केलेल्या सहा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे