धुळे तालुक्यातील मुसळधार पावसामुळे खरिपाची पिकं पाण्याखाली गेल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर माजी आमदार कुणाल पाटील गोंदूर शिवारात पोहोचले. त्यांनी गुडघाभर पाण्यात उतरून नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधत धीर दिला. पाटील यांनी ही माहिती मुख्यमंत्र्यांना दिल्याचं सांगत जास्तीतजास्त भरपाई व पिकविमा कंपन्यांकडून २५ टक्के अग्रिम रक्कम मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचं आश्वासन दिलं.