माण तालुक्यातील मार्डी-राणंद हद्दीतील हेळकर पठारावर झालेल्या वृद्धेच्या खुनाच्या प्रकरणाचा दहिवडी पोलिसांनी अवघ्या काही तासातच उलगडा केला आहे. या प्रकरणी मृत महिलेच्या नातवासह एका साथीदाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यातून शुक्रवारी सायंकाळी सात वाजता देण्यात आलेल्या माहितीनुसार मृत हिराबाई दाजीराम मोटे वय ७५, रा. मार्डी या १० सप्टेंबरपासून बेपत्ता होत्या. त्यांचा शोध सुरू असताना त्यांचा मृतदेह राणंद हद्दीतील हेळकर पठारावर आढळला होता.