सामाईक रस्त्यावरून जाण्याच्या वादातून एका ३४ वर्षीय विवाहितेवर कोयत्याने आणि तिच्या कुटुंबीयांवर बांबू व बॅटने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना टाकळीमिया येथे घडली आहे. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात एकाच कुटुंबातील पाच जणांविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, पाच दिवस उलटूनही आरोपींना अद्याप अटक करून कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप पिडीत कुटुंबियांनी केला आहे.आज त्यांनी रविवारी दुपारी मिध्यमांनासमोर येत न्यायाची मागणी केली आहे.