शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) येथील आयसीयु विभागालगत असलेल्या इलेक्ट्रिक रूममध्ये बुधवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी 8 वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन विभाग प्रमुख कटले यांनी दिली. घटनेची चाहूल लागताच सुरक्षारक्षकांनी तत्परतेने अग्निशमन सिलेंडरचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, मोठे आवाजाचे स्फोट झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. माहिती मिळताच महापालिकेचे अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले व CO2 तसे