मंद्रुप अप्पर तहसिल कार्यालयाच्या आदेशान्वये शनिवार, दि. ६ सप्टेंबर रोजी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास तलाठी राजेश शंकरराव विटेकर यांचे पथक मंद्रुप तालुक्यातील निंबर्गी गावाजवळील बिराजदार वस्ती येथे फिरताना अवैधरित्या मुरुम उत्खनन करणारा ट्रॅक्टर चालक इरफान अमुलाल हवालदार (रा. निंबर्गी, ता. सोलापूर) याला पकडले. पाहणी दरम्यान त्याच्या ताब्यातील लाल रंगाचा, नंबर प्लेट नसलेला ट्रॅक्टर व ट्रॉलीमध्ये सुमारे १ ब्रास मुरुम आढळून आला.