लातूर : मुंबईहून मित्राने पाठविलेली ९ लाख ५० हजार रूपये कुणीतरी हिसकावून नेले, असा बनाव करून शिवाजीनगर पोलिसांत तक्रार दाखल करणाऱ्या तरुणाचा डाव उघडकीस आला आहे. पोलिसांनी वेळेवर तपास सुरू करून संशयितांना ताब्यात घेतल्याने हा बनाव भंडाफोड झाला. या कारवाईत दोन जणांना रोख रकमेसह अटक करण्यात आली असून आणखी दोन आरोपी फरार आहेत.