एका रेल्वे कर्मचाऱ्याने घरातच दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरातील गवराळा येथे दिनांक ४ रोज गुरुवारला रात्रो ८.३० वाजताच्या सुमारास घडली. धम्मचक्र भगवान ठमके,वय ३९ वर्ष, राहणार गवराळा असे या आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर भद्रावती पोलीसांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला व याप्रकरणी मर्ग दाखल केला आहे.