भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू झाला. तर पाठीमागे बसलेला एक जण जखमी झाला. ही घटना केज - मांजरसुंबा रस्त्यावरील सावंतवाडी फाट्यावर घडली. विशाल किसन चाळक (वय २३) असे अपघातात मरण पावलेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. अपघातानंतर, ट्रक चालक आयुब मोहम्मदखान पठाण (वय ४२, रा. महाराणा प्रताप नगर, म्हाडा कॉलनी, लातूर) हा पळून जात होता. त्याला पाठलाग करून ट्रकसह पकडण्यात आले.