आज दि २४ ऑगस्ट रोजी सांयकाळी साडे पाच वाजता माध्यमांना माहिती मिळाली कि नाचनवेल शिवारात अद्रक पिकाला ठिबकद्वारे खत सोडण्यासाठी गेलेल्या संदीप चत्तरसिंग राजपूत (२४) याचा विद्युत पंप सुरू करताना विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. पिशोर पोलिसांनी पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद केली. आरडाओरड ऐकून शेजारी शेतकरी धावून आले व संदीपला नाचनवेल प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.