सेनगांव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी चंद्रकांत हराळ यांची बिनविरोध निवड झाली असून या निवडीबद्दल त्यांचा भव्य सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.आज दिनांक 3 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता सेनगांव बाजार समितीच्या सभापती पदी चंद्रकांत हराळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी हिंगोली विधानसभेचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगांवकर,भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष शिवाजीराव मुटकुळे यांच्या सह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.