भंडारा पवनी विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या पुढाकारातून भंडारा शहरातील विविध ठिकाणी सौंदर्यकरणाचे काम सुरू आहे. दरम्यान दिनांक 13 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता दरम्यान आमदार भोंडेकर यांनी भंडारा शहरातील खाम तलाव, भंडारा शहराजवळील वैनगंगा नदी काठावर तसेच शहरातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या सौंदर्यकरणाच्या कामाची पाहणी केली. यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी व अनेक मान्यवर उपस्थित होते.