दहिगाव या गावात महमूद हुसेन पटेल वय ४८ हा इसम आपल्या घरी होता दरम्यान या इसमाने गावाच्या शेत शिवारात असलेल्या मनोज खुशाल तेली यांच्या शेत गट क्रमांक ५१३/१/अ यातील शेत विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांना यावल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मयत घोषित केले. तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.