प्रेयसीने लग्नाचा हट्ट धरल्याने प्रियकराने दोन सहकार्याच्या मदतीने प्रेयसीचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह आंबा घाटातील दरीत फेकून दिला. दिनांक २१ ऑगस्ट रोजी मिरजोळे येथील हेमंत जितेंद्र मयेकर यांनी बहीण बेपत्ता असल्याची फिर्याद रत्नागिरी शहर पोलिसात दिली. याप्रकरणी खंडाळा येथील बार व्यवसायिक दुर्वास दर्शन पाटील वय ३० यास पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतले. तपासात त्याने खून केल्याचे कबूल केले.