जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या भूमि अभिलेख कार्यालयात आज दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठी कारवाई करत उपअधीक्षक अनिल पांडुरंग नेमाडे आणि नगर परीक्षण भूमापक चंद्रशेखर पुंडलिक गोले यांना ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. या कारवाईमुळे कार्यालयात खळबळ उडाली आहे. तक्रारदाराचा मुलगा परदेशात वास्तव्यास असून त्याचे कॅम्प परिसरातील नवजीवन कॉलनी येथे घर आहे. या घराचा मुखत्यारनामा त्याने वडिलांच्या (तक्रारदार) नावावर केला होता. त्यानंतर घराच्या फेर