सर्वसामान्य शेतकऱ्यांवर राष्ट्रीयीकृत, खाजगी व सहकारी बँकांकडून कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ देणार नाही. रयत क्रांती शेतकरी संघटनेने दिलेल्या तक्रारीवरून तात्काळ जिल्हा प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. सातारा येथे बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास रयत क्रांती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव यांनी पालकमंत्री कार्यालयात मंत्री देसाई यांची भेट घेतली व बँकांकडून शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाची माहिती दिली.