नेपाळमध्ये फिरायला गेलेले अकोल्यातील 10 जण अडकल्याची माहिती समोर आली आहे. यातील 5 जण पोखरा येथील एका हॉटलेमध्ये सुरक्षित असून उर्वरित पाच जण काठमांडू येथील हॉटलेमध्ये आहेत. हे दहाही जण सुरक्षित असल्याची माहिती अकोला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. यातील पोखरा येथील पाच जण रात्री भारतात परत येण्यासाठी निघाले असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे, तर उर्वरित पाचही जण आज काठमांडू येथून भारतासाठी परतणार आहेत. दहाही जण सुखरूप असल्याची माहिती आहे.