यंदा खुलताबाद शहरासह संपूर्ण तालुक्यात डीजेला खो देत सर्व गणेश मंडळांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात बाप्पाला निरोप दिला. ढोल-ताशा, झांज, हलगी, नागारा, तुरई आणि भजन पथकांच्या सुरावटींवर विसर्जन मिरवणुका निघत असून भक्तिरसात न्हाऊन निघालेलं वातावरण सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. आज पोलिस निरीक्षक धनंजय फराटे यांनी शहरासह विविध गावांमध्ये भेटी देत यंदाचा गणेश उत्सव डीजे-मुक्त साजरा होत असल्याचं स्पष्ट केलं.