अंजनगाव दर्यापूर मतदार संघातील एका पेशंटला जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे भरती केले असता पेशंटच्या वडिलांनी उपचार योग्य पद्धतीने व्हावा यासाठी आमदार गजानन लवटे यांना फोन लावला आणि तो फोन नर्स ला दिला, नर्स ने आ.गजानन लवटे यांच्याशी मला तुमचा आवाज येत नाही,मला माझं काम करु द्या, असे उद्धटपणे बोलणाऱ्या नर्स ची आज दुपारी १ वाजता गजानन लवटे यांनी जिल्हा रुग्णालयात जावून चांगलीच कान उघाडणी केली. आणि काम करणे जीवावर येत असेल तर जागा खाली करा बरेच लोक काम करण्यासाठी रांगेत उभे आहेत.