बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील सिंदफणा नदीत बुधवारी (३ सप्टेंबर) एक हृदयद्रावक घटना घडली. पिंपळगाव कानडा येथील रहिवासी संदीपान रामकिसन ढोरमारे (वय ५०) हे शेतकरी नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, गेवराई तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. बुधवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास संदीपान ढोरमारे हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतात जाण्यासाठी घराबाहेर पडले. मात्र त्यांना सिंदफणा नदीत आलेल्या पुराचा अंदाज आला नाही