पोलिसांना फोनकरून माहिती सांगतोस, या संशयावरून एकाला काठीने मारहाण करण्यात आली. ही घटना जिंतूर तालुक्यातील करंजी येथे घडली. याप्रकरणी मांगळवारी १६ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता बामणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नारायण दशरथ ढोणे यांनी तक्रार दिली की, राजेश गणपत कन्हाळे याने तु पोलिसांना फोन करून मी दारू विकतो असे सांगितले, असे म्हणत मारहाण केली.