धर्माबाद नगर पालिका निवडणूक 2025 च्या अनुषंगाने आजरोजी सकाळी 10 ते 12 ह्या वेळेत नगर पालिका कार्यालयाच्या शेजारी असणाऱ्या माहेश्वरी भवन येथे शहरातील 11 प्रभागात प्रत्येकी 2 ह्या प्रमाणे नगर सेवक पदाची विविध जाती निहाय आरक्षण सोडत कार्यक्रम संपन्न झाला असून यावेळी नगर पालिकेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी दाभाडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला आहे.