कोल्हापूर शहराला आणि पुरवठ्याचे लागलेलं ग्रहण आपल्याला घालवायचा आहे असं प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिंगणापूर येथील पाणीपुरवठा योजनेच्या पाहणी दरम्यान केला आहे. दरम्यान पाणीपुरवठ्याच्या पर्यायी यंत्रणा सज्ज करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करा अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्यात. गेल्या चार दिवसापासून कोल्हापूर शहरात पाण्याचा ठणठणाठ आहे या पार्श्वभूमीवर आमदार क्षीरसागर यांनी महापालिका अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.